राज्यातील शेतकरी सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. तसेच खरीप हंगामात कापूस तूर उभ्या पिकांची लागवड करण्यात व्यस्त आहे. खरीप हंगामातील कापूस व तूर पिके अंतिम टप्प्यात आली असून कापसाची उचल सुरू आहे.
गहू, हरभरा, ज्वारी, अळशी या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याही शेतकऱ्यांनी सुरू केल्या आहेत. खरतर खरीप हंगामातील पावसाच्या अनियमिततेचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यंदा सुरुवातीलाच पाऊस लांबल्याने खरिपमध्ये पेरण्या खोळंबल्या होत्या.
जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाच्या वाढीच्या टप्प्यातील पिके उन्मळून पडली. यातून शेतकऱ्यांना आपली पिके वाचविण्यात यश आले, मात्र पुन्हा ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर परिणाम झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे.
दरम्यान, खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी कंबर कसली आहे. मात्र पुन्हा एकदा पावसाच्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले हवामानतज्ज्ञ पंजाबराव डाख यांनी महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे.
पंजाब राव यांच्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 24 तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील आणि थंडीचा जोर तीव्र होईल. पण त्यानंतर हवामानात बदल होईल आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 24 तारखेनंतर महाराष्ट्रात पाऊस पडेल, असं पंजाब राव यांनी नमूद केलं आहे. मात्र, पंजाब राव यांनी पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार याची माहिती अद्याप दिलेली नाही.
पण पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन-तीन दिवसांत २४ तारखेनंतर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात पावसाची शक्यता किती असावी, याबाबत हवामानाचा नवा अंदाज जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्रात पाऊस कोसळेल, असा अंदाज पंजाब राव यांनी पुन्हा एकदा व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार हे नक्की. १५ नोव्हेंबर रोजी पंजाबराव यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एका कार्यक्रमाला येऊन शेतकऱ्यांसाठी हा हवामान अंदाज जारी केला.