राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका असल्यामुळे राज्य शासनाने लसीकरण करण्यास अधिक प्राधान्य दिले आहे. आता बुस्टर डोस (Vaccination)देण्याचीही तयारी सुरु आहे.

पहिल्या टप्प्यात केवळ ६० वर्षापुढील नागरिकांना व ज्यांना रक्तदाब, मधुमेह अशा व्याधी आहेत अशांना बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

दुसरा डोस घेऊन ९ महिने झाले असतील तरच बुस्टर डोस मिळणार आहे.

सोमवार पासून नियमाप्रमाणे बुस्टर डोस मिळणार आहे.

जिल्ह्यात ६० वर्षापेक्षा अधिक वयोगटात असलेले १ लाख १४ हजार ६६७ जण आहेत.

बूस्टर डोस देण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. दुसरा डोस घेऊन ज्यांना 9 महिन्यांचा कालावधी झाला आहे, अशा ज्येष्ठांना, तसेच आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

या बुस्टर डोसेच 60 पेक्षा जास्त वयोगटातील 5 लाख 73 हजार 400, तसेच आरोग्य कर्मचारी 41 हजार 861 आणि 54 हजार 677 फ्रंटलाईन वर्क हे लाभार्थी राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ज्यांनी ज्या लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना त्याच लसीचा डोस देण्यात येणार आहे.

Share.