Ahmednagar flyover news नगर शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद-पुणे महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी १२ वर्षांपूर्वी खासगी ठेकेदाराला काम देण्यात आले होते. त्यावेळी या पुलासाठी केवळ १८ कोटींचा खर्च येणार होता. तब्बल १२ वर्षांपासून या पुलाच्या चर्चेचे गुन्हाळ सुरू होते. दोन वेळा या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, काम सुरू होऊ शकले नव्हते. दरम्यानच्या काळात या उड्डाणपुलाचा खर्च १८ कोटींवरून २५६
नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात असून, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या पुलाचे उद्घाटन करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
नगर शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद-पुणे महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी १२ वर्षांपूर्वी खासगी ठेकेदाराला काम देण्यात आले होते. त्यावेळी या पुलासाठी केवळ १८ कोटींचा खर्च येणार होता. तब्बल १२ वर्षांपासून या पुलाच्या चर्चेचे गुन्हाळ सुरू होते. दोन वेळा या उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, काम सुरू होऊ शकले नव्हते. दरम्यानच्या काळात या उड्डाणपुलाचा खर्च १८ कोटींवरून २५६
कोटींवर पोहोचला होता. यानंतर खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी पुलासाठी लागणाऱ्या लष्कराच्या जागेचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर उड्डाणपुलाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या पुलासाठी निधीची कमतरता जाणवू देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. त्यानुसार त्यांनी हा निधी दिला होता.
नगर शहरातील उड्डाणपुलामुळे औरंगाबाद हुन पुण्याकडे व पुण्याहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या प्रवाशांचा ३० मिनिटांचा वेळ वाचणार असून, सणासुदीच्या कालावधीत पुण्याहून औरंगाबाद सह मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना स्वस्तिक चौक, माळीवाडा बसस्थानक व कोठला चौक या परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे त्रास सहन करावा लागत होता. दुसरीकडे या उड्डाणपुलासह बाह्यवळण रस्त्याचे कामही सध्या प्रगतिपथावर आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गांना जोडला जाणार आहे. या पुलामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
ahmednagar flyover news
६७० दिवसांत उभारलेल्या या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. २५८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या बहुचर्चित पहिल्या उड्डाणपुलाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. किरकोळ २ टक्के कामे शिल्लक असून, ते काम येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे.