मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रसायणीजवळ एसटी आणि कारचा अपघात झाला आहे. आमदार संग्राम जगताप या अपघातातून बचावले आहेत. संग्राम जगताप यांची कार चक्काचूर. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
मुंबईकडे जाताना बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. पहाटे साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली.
आमदार संग्राम जगताप हे आपल्या बीएमडब्ल्यू कारने मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. एसटी बसची धडक अत्यंत भीषण होती. यात आमदार संग्राम जगताप यांची लक्झरी कार चक्काचूर आली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.