Ahmednagar :सर्व आंबेडकरी अनुयायी दरवर्षी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे नगर पुणे महामार्गावरील गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. नगर पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा व नगर येथून पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन दिवसांपासून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. 31 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत सकाळी 6.00 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा, देव दैठण, धातगाव, पिंपरी कोलंदर, उक्कडगाव, बेलवंडी, नगर-दौंड महामार्गाने लोणी व्यंकटनाथ, मळेवडगाव, कास्ती, दौंड-सोलापूर-पुणे महामार्गावरून पुण्याकडे जावे लागते. नगरहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक कायनेटिक चौक, केडगाव बायपास, अरणगाव बायपास, लोणी व्यंकनाथ, मळेवडगाव, कास्ती, दौंड-सोलापूर-पुणे महामार्गावरून पुण्याकडे वळवण्यात आली आहे..

Share.