Ahmednagar news : अहमदनगर तब्बल दोन वर्षानंतर यंदा जिल्हाभरात गणेशोत्सव धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. आज गणेश चतुर्थी दिवशी श्रींची स्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ९१७ गणेश मंडळांना जिल्ह्यात परवाने देण्यात आले आहेत, तर उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने जिल्हाभरात चार हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

कोरोना महामारीच्या काळात गेली दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात होता. यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जिल्हाभरातील सार्वजनिक गणेश मंडळातर्फे श्रींच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी ९१७ सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्ह्याबाहेरून अतिरिक्त मदतीचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात सुमारे ३००० कर्मचारी व अधिकारी, तर जिल्ह्याबाहेरील सुमारे १३०० अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे ४ ते ४.५ हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी कायद्याचे पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

Ahmednagar शहरी शहरांमध्ये १६८ मंडळांना परवानगी


शहरातही यंदा गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. श्रींच्या आगमनासाठी गणेश मंडळाने जोरदार तयारी केली आहे. ढोलताशांच्या गजरात श्रींचे आगमन होईल. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे श्री. प्रतिष्ठापना करणार आहेत शहरात 168 गणेश मंडळांना नगरपालिकेने परवानगी दिली आहे.

Ahmednagar असा आहे पोलिस बंदोबस्त


जिल्ह्यात २ अप्पर पोलिस अधीक्षक, ७ पोलिस उपअधीक्षक, ३५ पोलिस निरीक्षक, ४७ सहायक पोलिस निरीक्षक, ६८ पोलिस उपनिरीक्षक व ३ हजार ४५ इतर पोलिस कर्मचारी उपलब्ध आहेत. जिल्ह्याबाहेरून १ पोलिस उपअधीक्षक, २ पोलिस निरीक्षक, ५ सहायक व उपनिरीक्षक, २० प्रोबेशनरी पोलिस उपनिरीक्षक, १०० प्रोबेशनरी पोलिस कर्मचारी, १२०० होमगार्ड आणि राज्य राखीव दलाची १ तुकडी तैनात करण्यात आली आहे.

Ahmednagar गणेश मंडळांना सरकारकडून पुरस्कार


सार्वजनिक गणेशोत्सवात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना राज्य सरकारतर्फे बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने केले आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ४६५ जणांवर कारवाई


कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नगर व भिंगार शहरात पोलीस प्रशासनाने ४६५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सीआरपीसी १०७ अंतर्गत ९९, सीआरपीसी ११० अंतर्गत ४१, सीआरपीसी १४९ अंतर्गत १४७ जणांना नोटीस देऊन त्यांच्याकडून हमी घेतली जात आहे. सीआरपीसी 144 (2) आणि इतर कायद्यांनुसार उत्सवादरम्यान 178 लोकांना शहरातून हद्दपार करण्यात येणार आहे.

Share.