Ahmednagar उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड एक्टीव्ह असतात. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ते सातत्याने नवनवीन क्रिएटीव्ह व्हिडिओ शेअर करत असतात. यापूर्वी त्यांनी एका जुगाड जिप्सीचा व्हिडिओ शेअर करत, त्या मॅकेनिकला चक्क नवीन बोलेरो कार गिफ्ट केली होती. त्याबदल्यात त्याने बनवलेली जुगाड जिप्सी त्यांनी त्यांच्या संग्रहलयासाठी ठेऊन घेतली. महिंद्रांच्या या लोकल टचमुळेच सोशल मीडियावर त्यांचा फोलोअर्स बेस हा ग्रामीण भागातील वाढला आहे. आता, त्यांनी अहमदनगरमधील एका फॅब्रिकेटर्सवाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आनंद महिंद्रांनी ट्विटवरुन शेअर केलेला व्हिडिओ अतिशय क्रिएटीव्ह असून या व्हिडिओत फोल्डींग लोखंडी जिना दिसून येत आहे. हा जिना पाहून आऊटस्टँडिंग, एवढं सहज आणि भावणारं. क्लटरिंग स्पेस व्यतिरिक्त ही क्रिएटीव्ह डिझाईन प्रत्यक्षात एक आकर्षक सौंदर्याचा घटक आहे. बाह्य भिंतीमध्ये पूर्णपणे हा लोखंडी फोल्डींग जिना कौतुकास्पद आहे. या स्कॅन्डिनेव्हियन डिझायनर्सचा हेवा वाटावा अशी वस्तू असल्याचे आनंद महिंद्रांनी म्हटले आहे. मात्र, हा व्हिडिओ कोणाचा आहे, हे मला माहिती नाही, व्हॉट्सअपद्वारे हा व्हिडिओ मिळाला, असेही त्यांनी व्हिडिओ शेअर करताना स्पष्ट केले.

https://platform.twitter.com/widgets.js

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ अमहदनगरमधील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान यांनी बनविलेल्या जिन्याचा आहे. शहरातील जुन्या महापालिकेच्या समोर असलेल्या राज एंटरप्राईजेस दुकानाशेजारी अतिशय अरुंद गल्लीत जागेअभावी जिना करणं कठीण जात होतं. त्यावेळी नगरच्या पंचपीर चावडी येथील समीर बागवान या युवकाला फोल्डिंग जिना बनविण्याची कल्पना सुचली. त्यातून हे इनोव्हेटीव्ह काम घडून आले. समीर हा फेसबुकवर नेहमीच अशा जुगाडू निर्मितीचे व्हिडीओ पाहत असतो. त्यातूनच अशा पध्दतीचा जिना आपण येथे बनवू शकतो अशी कल्पना त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगितली.

आनंद महिंद्रांनी त्यांच्या कामाचे थेट कौतुक केल्याने त्यांना आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. यासोबतच त्यांनी महिंद्राचे आभार मानले आहेत. महिंद्रा यांनी व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर आम्हाला नातेवाईक आणि मित्रांकडून फोन येत आहेत आणि अनेकांनी आमचे अभिनंदन केले आहे आणि कौतुक केल्याचे समीर यांनी म्हटले.

Share.