Ahmednagar news सध्या नगर शहरात मकरसंक्रांतीनिमित्त पतंगविक्री जोरात सुरू असून पतंगोत्सव साजरा करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. शहरात वीजवितरणचे विद्यूत फिडर, व लघु व उच्च दाबाच्या तारांचे जाळे पसरलेले आहे. अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात. अशावेळी अडकलेले पतंग काठ्या, लोखंडी रॉडच्या माध्यमातून काढण्याच्या प्रयत्नात जिवंत विद्युत तारेला स्पर्श होवून जीवावर बेतू शकते. तारेला अडकलेल्या पतंगाचा मांजाखाली जमिनीवर लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात ओढताना एका तारेचे दुसऱ्या तारेवर घर्षण होऊन शॉर्टसर्किटचा धोक उद्भवतो. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडीत होवू शकतो. अनेक पतंग या विजवाहिन्यांमध्येमांजा अडकतात. नायलॉन मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून या मांजावर धातुमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह

Ahmednagar news

संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा करण्यात आले आहे.खंडित होऊ शकतो. अपघाताची शक्यताही वाढते. नागरिक आणि लहान मुलांनी वीजवाहिन्या, वीज यंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षीत आणि मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. पउत्साहात कुठलेही विघ्न येऊ नये म्हणून वीजप्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्सव साजरा करावा. तसेच तातडीने मदतीची गरज पडल्यास संबंधीत क्षेत्रातील महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणकडून

Share.