Ahmednagar News अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश
रमजान ईद व अक्षयतृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी १ ते ५ मे रोजीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
आदेश जारी अहमदनगर जिल्ह्यात ३ मे रोजी रमजान ईद व अक्षयतृतीया हे सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. सदर उत्सवाच्या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्ष कामगार संघटनातर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको होतात. त्याचप्रमाणे सध्या जिल्हयात यात्रा उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. त्यावेळी मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटनावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.