कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यांची तब्येत व्यवस्थित असून ते घरीच उपचार घेत असल्याच सांगण्यात आलेय. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटेलय की, तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!

Share.