Ahmednagar Onion Market नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी कांद्याच्या आवकेत १८ हजार गोण्यांनी घट झाली. सोमवारी ५८ हजार ६५४ गोण्यातून (३२ हजार २१८ क्विंटल) आवक झाली असून जास्तीत जास्त भाव १८०० रुपयांपर्यंत मिळाला.

एक-दोन लॉटला १६०० ते १८०० रुपये भाव मिळाला. मोठ्या कलरपत्ती कांद्याला १३०० ते १४०० रुपये, मुक्कल भारी कांद्याला ११०० ते १२०० रुपये, गोल्टा कांद्याला ८०० ते ९०० रुपये, गोल्टी कांद्याला ३०० ते ७०० रुपये, जोड कांद्याला २०० ते १४५० रुपये, हलक्या डॅमेज कांद्याला १०० ते ४०० रुपये भाव मिळाला.

Onion Market

Share.