अहमदनगर ‘गुरु पौर्णिमा’, ‘आण्णाभाऊ साठे स्मृतीदिन’, ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती’ व ‘संत गोदड महाराज रथ यात्रा कर्जत’ हे सण व उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी १३ ते २६ जुलैपर्यंत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न


नगरपंचायत व नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच विविध राजकीय पक्ष कामगार संघटनातर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कार्यालय तोडफोडीच्या घटना होण्याची शक्यता आहे. वरील पार्श्वभूमीवर जिल्हयात कोणत्याही किरकोळ घटनावरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Share.