Ahmednagar नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये काल सोमवारी कांद्याच्या जास्तीत जास्त भावात दीडशे रुपयांनी वाढ झाली. जास्तीत जास्त भाव 1700 रुपयांपर्यंत मिळाला. सोमवारी आवकेतही 12 हजार गोण्यांनी वाढ झाली. 304 वाहनांतून 55 हजार 351 गोण्यात 30 हजार 443 क्विंटल कांद्याची आवक झाली.

एक-दोन लॉटला 1600 ते 1700 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
मोठा कलरपत्ती कांद्याला 1350 ते 1550 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1200 ते 1400 रुपये, गोल्टा कांद्याला 800 ते 1100 रुपये, गोल्टी कांद्याला 500 ते 900 रुपये, जोड कांद्याला 200 ते 450 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 100 ते 600 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

Share.