Bajaj देशातील चौथ्या क्रमांकाची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज १०० ते १५० सीसी सेगमेंटमध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांची निर्मिती करते. चांगले मायलेज असलेल्या बाइक्स ही या कंपनीची खासियत आहे. कंपनीने आपले सर्वाधिक मायलेज टू-व्हीलर मॉडेल बंद केले आहे. बजाज सीटी१०० असं या बाईकचं नाव आहे. कंपनीने काही वर्षांपूर्वी नवीन रंग आणि अपडेटेड फिचर्ससह ही बाईक लाँच केली होती. कंपनीच्या बाईक पोर्टफोलियोमधील ही सर्वात स्वस्त बाईक होती. रिपोर्ट्सनुसार, बजाज डिलर्सनी बाईकचं बुकिंग बंद केलं असून कंपनीच्या वेबसाईटवरूनही बाईक हटवण्यात आली आहे.

दरम्यान, कंपनीने सीटी100 चे उत्पादनही बंद केल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून हे मॉडेल भारतातून बंद करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, बजाज ऑटोने हे मॉडेल बंद करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.

Bajaj Affordable bike in the 100cc segment

१०० सीसी सेगमेंटमधील स्वस्त बाइक

बजाज सीटी100 ही बाईक आता खरेदीसाठी उपलब्ध नसली तरी त्याची जागा घेणारी बाईक कंपनीने आधीच सादर केली आहे. बजाज सीटी लाइनअपमध्ये केवळ सीटी ११० एक्स ही बाइक खरेदीसाठी उपलब्ध आहे. बजाज सिटी लाइनअपमधील बाइक स्वस्त असून चांगले मायलेज देतात. सीटी१०० ची किंमत ५३,६९६ रुपये होती. १०० सीसी सेगमेंटमधील सर्वात स्वस्त बाइक म्हणून ती ओळखली जात होती.

आधी सांगितल्याप्रमाणे बजाज सीटी100 ही बाईक आपल्या दमदार मायलेजसाठीही प्रसिद्ध आहे. ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये 60 ते 70 किमी प्रति तासाचे मायलेज देण्यास सक्षम आहे. कंपनीने बाईकमध्ये 102 सीसी एअर-कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन वापरले आहे जे 7.79 बीएचपी पॉवर आणि 8.34 एनएम टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे. यात ४ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

IMPORTANT : तुमचे Pan Card वापरून इतर कोणी Loan तर घेतले नाही? ‘या’ सोप्या प्रोसेसने मिळेल सर्व माहिती

Share.