BRAKING NEWS महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार होत असताना, बिहारमध्ये नितीश कुमार व भाजप युतीचं सरकार आज (ता. 9) कोसळलं.. भाजपच्या 16 मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे राज्यपालांकडे सादर करताना, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापासून फारकत घेत असल्याचं जाहीर केलं आहे..

बिहारच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला.. नितीश कुमार यांनी भाजपपासून अधिकृतपणे दूर होण्याचा निर्णय घेतला.. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करुन ते लवकरच पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावा करु शकतात.. त्यासाठी नितीश कुमार यांनी राज्यपाल फग्गू चौहान यांच्याकडे भेटीची वेळही मागितल्याचे समजते..

भाजप-नितीश कुमारांमध्ये खटके

गेल्या काही दिवसांपासूनच भाजप व नितीशकुमार यांच्यात खटके उडत होते.. गेल्या महिनाभरापासूनच नितीशकुमार भाजपपासून अंतर राखून असल्याचं दिसत होते.. त्यामुळे ‘एनडीए’ सरकार कोसळून, नितीश कुमार पुन्हा एकदा ‘राजद’सोबत सरकार स्थापन करतील, असे अंदाज बांधले जात होते. त्यानुसार, आज नितीश कुमारांचे सरकार कोसळलं..

पाटणा येथील 1 आणे मार्ग आणि राजभवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ‘जेडीयू’ आमदार-खासदारांची बैठक सुरू असून, लोकप्रतिनिधींना बैठकीस मोबाईल नेण्यास मनाई केली होती. सर्वांचे मोबाईल बंद ठेवले होते. राजभवनाचीही सुरक्षा वाढवण्यात आलीय. आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राजभवनात जाणार असल्याचे सांगण्यात आले..

दरम्यान, काँग्रेससह डाव्या पक्षांनी आपल्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र ‘राजद’चे तेजस्वी यादव यांना दिलंय. पाटणा येथील ‘राबडी’ निवासस्थानी झालेल्या महाआघाडीच्या बैठकीत तेजस्वी यांना हे समर्थन पत्र देण्यात आलं. त्यामुळे लवकरच बिहारमध्ये ‘राजद’सोबत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरु आहेत..

Share.