प्रसिद्ध गायक संगीतकार बप्पी लाहिरी यांचं वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. निधन झालं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीटीआयनं डॉक्टरांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.बप्पी लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. ते बंगाली ब्राह्मण कुटुंबातील होते.
भारतीय मुख्य प्रवाहात डिस्को संगीत लोकप्रिय करण्यासाठी प्रसिद्ध असलेले, गायक बप्पी दा या नावाने ओळखले जात होते आणि 1980 आणि 90 च्या दशकात त्यांना प्रचंड यश मिळाले. डिस्को डान्सर, नमक हलाल, डान्स डान्स, कमांडो यांसारख्या चित्रपटातील कामामुळे त्यांना ‘डिस्को किंग’ ही पदवी मिळाली.