बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता महत्वाची बातमी समोर येत आहे. परीक्षा तोंडावर असताना आता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भाषा विषयाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.मिळालेल्या वृत्तानुसार,5 आणि 7 मार्चला भाषा विषयाचे पेपर होणार होते, पण ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार 5 आणि 7 एप्रिलला आता या विषयांचे पेपर घेतले जाणार आहेत. 5 मार्चला प्रामुख्याने हिंदी, जर्मन, जपानी, चीनी आणि पर्शियन या भाषा विषयांचे पेपर होणार होते, ते पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत. तर 7 मार्चला मराठी, गुजराती, कन्नड, हिंदी, मल्याळम, तेलगु, पंजाबी, उर्दु, फ्रेंच अशा विषयांचे पेपर होणार होते, पण हे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहे.काही अपरिहार्य कारणास्तव पेपर पुढे ढकलण्यात आल्याची बोर्डाने माहिती दिली आहे.
Trending
- सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींची उमेदवारी रद्द, देशाच्या राजकारणात खळबळ; नेमकं प्रकरण काय आहे?
- शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी जिल्ह्यानुसार यादी जाहीर
- Ahmednagar Breaking: अहमदनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले
- प्रमोद महाजनांनी शिवसेनेविषयी केलेले ‘ते’ भाकित खरे ठरले! म्हणाले होते
- आता ठाकरेविना शिवसेना; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का !
- Electricity bill waived या सर्व नागरिकांचे वीज बिल माफ, वीज बिल माफ यादीत तुमचे नाव तपासा
- Gramsevak Bharti 10 हजार पदांसाठी नवीन ग्रामसेवक भरतीचा सरकारचा मोठा निर्णय
- online land record :आता तुमच्या घरच्या आरामात तुमच्या शेत जमिनीचा नकाशा, फेरफार, सातबारा ऑनलाइन पहा