छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
विविध गंभीर गुन्हे दाखल
छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठवला होता. अधीक्षक पाटील यांनी त्याला मंजुरी देत दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार केले आहे.