कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी लवकरच भारतात आपली इको व्हॅन अर्थात एमपीव्ही लाँच करणार आहे. CNG एका रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी इको नेक्स्ट जनरेशन मॉडेल तयार करत आहे. दिवाळीपूर्वी ही कार लाँच केली जाऊ शकते. मारुती सुझुकीचा इको १० वर्षांपासून देशांतर्गत बाजारात विकला जात आहे. आता लेटेस्ट अपडेट्ससह कंपनी नव्या लूक आणि फिचर्ससह ही कार लाँच करणार आहे.

2021-22 या आर्थिक वर्षात मारुतीचा इको एमपीव्ही प्रकारात सर्वाधिक विकला जाणारा प्रवासी वाहन होता, ज्यामध्ये 1.08 लाख युनिट्सची विक्री झाली होती. २०१० मध्ये कंपनीने इकोला लाँच केला होता. ही कार 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही प्रकारात येते. ही कार ४.०८ लाख रुपयांच्या एक्स-शोरूमपासून सुरू होते आणि ५.२९ लाख रुपयांपर्यंत जाते.

पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन प्रकारच्या इंजिन पर्यायांसह येणार आहे. पहिल्या व्हर्जनमध्ये १.२ लीटर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. CNG किटने सुसज्ज असलेल्या या इंजिनमध्ये ६३ पीएस पॉवर आणि ८५ एनएम टॉर्क तयार होतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कारच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये 16.1 केएमपीएल मायलेज दिले जाते आणि सीएनजी व्हेरिएंट 20.88 केएमपीएल / किलो मायलेज देते.

Share.