Flipkart down ?

मुंबई :
भारतातील आघाडीची असणारी ई-कॉमर्स फ्लिपकार्ट आता ऐन सेलच्या धामधुमित आऊट ऑफ स्टोक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून फ्लिपकार्ट विविध ऑफर देत आहे. काही सेल्सचे आयोजनही फ्लिपकार्टने ऑनलाईन केले होते. मात्र गेल्या काही मिनिटांपासून देशभरात फ्लिपकार्ट वेबसाईट आऊट ऑफ स्टोक झाली असल्याचे समोर आले आहे. अजून किती वेळ वेबसाईट आऊट ऑफ स्टोक राहणार याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विविध आकर्षक ऑफर असल्याने सध्या फ्लिपकार्टवर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. मात्र सगळ्याच वस्तू आऊट ऑफ स्टोक झाल्याने आता फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांची नाराजी ओढून घेतली आहे. सध्याच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आम्ही आपल्याला देत आहोत आणि वेळेनुसार अपडेट करत आहोत.


विविध ग्राहकांनी आज फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उड्या घेतल्या मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. ग्राहक सध्या कुठलीही वस्तू खरेदी करू शकत नाहीत.

Share.