सध्या ॲमेझॉन इंडिया या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन्सवर जोरदार ऑफर्स आहेत. जर तुम्ही स्वत:साठी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही सर्वोत्तम वेळ आहे. आज आम्ही तुम्हाला ॲमेझॉनवर उपलब्ध असलेली अशीच एक उत्तम ऑफर सांगणार आहोत. ॲमेझॉनवर ही ऑफर बजेट स्मार्टफोन टेक्नो स्पार्क ८ प्रो या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. हा टेक्नो फोन कमी किमतीत मजबूत स्पेसिफिकेशन ऑफर करतो. या फोनमध्ये ११ जीबी रॅम, ५०००एमएएच बॅटरी, ३३ वॅट फास्ट चार्ज, ४८ मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि मीडियाटेक कडून शक्तिशाली प्रोसेसर आहे. तर जाणून घेऊया टेक्नो स्पार्क ८ प्रो स्‍मार्टफोनवर उपलब्‍ध ऑफर, तपशील आणि वैशिष्‍ट्ये याबद्दल माहिती देणार आहोत.

टेक्नो स्पार्क ८ प्रो (Tecno Spark 8 Pro) ऑफर आणि किमती

टेक्नो स्पार्क ८ प्रो स्मार्टफोन ॲमेझॉनवर ऑफरसह फक्त ८९९९ रुपयांमध्ये मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या टेक्नो फोनची किंमत ९६९९ रुपये आहे. वापरकर्त्यांना या फोनवर एसबीआय कार्डवर सूट मिळत आहे. यासोबतच तुम्ही जुन्या फोनची देवाणघेवाण करून अतिरिक्त सूट घेऊ शकता. जुन्या फोनची देवाणघेवाण केल्यावर, टेक्नोचा हा फोन ८००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

टेक्नो स्पार्क ८ प्रो स्पेसिफिकेशन्स

टेक्नो स्पार्क ८ प्रो स्मार्टफोन मध्ये १०८० x २४६० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.८ इंचाचा एफएचडी + एलसीडी डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस ५०० निट्स आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे. टेक्नो स्पार्क ८ प्रो स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राथमिक कॅमेरा ४८ एमपी आहे, ज्यामध्ये २ एमपी डेप्थ सेन्सर आणि २ एमपी एएल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. यासोबतच मागील पॅनलमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. या टेक्नो फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ड्युअल एलईडी फ्लॅश आहे.

टेक्नो स्पार्क ८ प्रो स्मार्टफोन ४ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि ६४ जीबी अंतर्गत स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. यासोबतच हा टेक्नो स्मार्टफोन ७जीबी एक्सपांडेबल रॅम फीचरला सपोर्ट करतो. म्हणजे टेक्नोच्या या फोनला ११ जीबी रॅमचा सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हा टेक्नो स्मार्टफोन अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित हायओएस ७.६ कस्टम स्किन आणि ५००० एमएएच बॅटरी आणि 33 वॅट चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ४जी एलटीइ, ड्युअल-बँड वाय-फाय, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट, ३.५ मिमी ऑडिओ जॅक आणि ब्लूटूथ ५.० आहे.

IMPORTANT : तुमचे Pan Card वापरून इतर कोणी Loan तर घेतले नाही? ‘या’ सोप्या प्रोसेसने मिळेल सर्व माहिती

Share.