Driving License जर तुम्ही गाडी चालवत असाल किंवा शिकत असाल, तर कायमस्वरूपी लायसन्स काढण्यापूर्वी तुम्ही शिकाऊ लायसन्स काढू शकता.

लायसन्सशिवाय गाडी चालवण्याचे दिवस गेले. अशा प्रकरणात पकडल्यास 5000 रुपयांचा मोठा फटका बसू शकतो. जर तुम्ही गाडी चालवत असाल किंवा शिकत असाल, तर कायमस्वरूपी लायसन्स काढण्यापूर्वी तुम्ही शिकाऊ लायसन्स काढू शकता. कायमस्वरूपी परवान्यासाठी आरटीओ केंद्रात जाऊन परीक्षा देणे आवश्यक आहे. पण महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा देऊनच लर्निंग लायसन्स घरबसल्या मिळू शकतं.

आपल्या सोयीनुसार या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आरटीओ एक्झाम हे विशेष अॅपही तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर कसा करायचा आणि ऑनलाइन लर्निंग लायसन्स कसं मिळवायचं ते जाणून घेऊया.

Driving License ऑनलाइन लर्निंग लायसन्ससाठी नोंदणी कशी करावी?


रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळाला (https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do) भेट द्या.
ड्रॉप डाऊन यादीत तुमचे राज्य निवडा
यानंतर तुम्हाला यादीतील उपलब्ध पर्यायांमधून लर्निंग लायसन्स तयार करण्याचा पर्याय निवडावा लागेल
घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्याय निवडा
भारत सरकारने जारी केलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट करा
आधार कार्ड व्हेरिफिकेशन ऑप्शनवर जा तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकावा लागेल त्यानंतर सबमिट करा.
येथे तुम्हाला जनरेट ओटीपी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
ओटीपी टाकल्यानंतर सर्व तपशील काळजीपूर्वक भरा आणि नियम आणि अटी स्वीकारण्याच्या पर्यायावर क्लिक करा. येथे ऑथेंटिकेशन बटणावर देखील क्लिक करा.
परवाना शुल्क भरण्याचा पर्याय निवडा

Driving License परीक्षा कशी देणार?

Driving License


आता परीक्षा घेण्यापूर्वी १० मिनिटांचा ड्रायव्हिंग इंस्ट्रक्शनल व्हिडिओ पाहावा लागेल, फॉरवर्ड न करता हा व्हिडिओ पाहावा अन्यथा तुम्हाला तो गृहीत न धरता पुन्हा पाहावा लागेल.
व्हिडिओ संपल्यानंतर, चाचणीसाठी एक ओटीपी आणि पासवर्ड आपल्या नोंदणीकृत क्रमांकावर पाठविला जाईल.
आता तुम्हाला दिलेला फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या डिव्हाइसचा फ्रंट कॅमेरा अॅक्टिव्हेट करावा लागेल.
यामध्ये तुम्हाला १० पैकी किमान ६ उत्तरं बरोबर मिळवावी लागतील.
एकदा तुम्ही योग्य उत्तर दिलंत की तुम्हाला लायसन्सची ऑनलाइन प्रत पाठवली जाईल.
जर तुम्ही योग्य उत्तर दिलं नाही, तर तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागेल आणि परीक्षा पुन्हा द्यावी लागेल.
दरम्यान, शिकाऊ लायसन्सची मुदत संपल्यानंतरच वाहनचालकाला कायमस्वरूपी परवाना घेण्यासाठी आरटीओमध्ये यावे लागते. शिकाऊ परवाना सहा महिन्यांसाठी वैध असतो.

3 Mid Size SUV : कमी मायलेजसह मध्यम आकाराची एसयूव्ही आणि स्टाईल आणि वैशिष्ट्यांसह चांगले मायलेज

Share.