Good News For SBI Customers एसबीआयने ट्विट केले आहे की, यापुढे मोबाईल फंड ट्रान्सफरवर एसएमएस चार्जेस आकारले जाणार नाहीत. ग्राहक आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहजपणे व्यवहार करू शकतात.

विविध बँकिंग सेवांसाठी आकारण्यात येणाऱ्या अनेक शुल्कापैकी एका शुल्कातून स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने मोबाइल फंड ट्रान्स्फरवरील एसएमएस शुल्क माफ केले आहे. एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे. युएसएसडी सेवांचा वापर करून युजर्स आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहजपणे व्यवहार करू शकतात, अशी माहिती एसबीआयने दिली आहे.

SBI ट्विट करून माहिती दिली आहे

एसबीआयने ट्विट केले आणि लिहिले, “मोबाईल फंड ट्रान्सफरवरील एसएमएस शुल्क आता माफ झाले! ग्राहक आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहज व्यवहार करू शकतात.” बँकेने पुढे म्हटले आहे की ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सेवांचा लाभ घेऊ शकतात, ज्यात पैसे पाठवणे, पैसे मागवणे, खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि UPI पिन बदलणे समाविष्ट आहे. यासाठी *99# डायल करा आणि बँकिंग सेवा पूर्णपणे मोफत घ्या. बँकेने पुढे म्हटले आहे की ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सेवांचा लाभ घेऊ शकतात, ज्यात पैसे पाठवणे, पैसे मागवणे, खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि UPI पिन बदलणे समाविष्ट आहे.

ज्यांच्याकडे फीचर फोन आहेत त्यांना फायदा होईल

ज्यांच्याकडे फीचर फोन आहेत त्यांना याचा फायदा होईल तसेच मोबाईल बँकिंग व्यवहारात त्याचा वापर केला जातो. ही सेवा फीचर फोनवर काम करते. त्यामुळे फीचर फोन असलेल्या ग्राहकांना फायदा होईल. SBI ने म्हटले आहे की युजर्स आता USSD सेवा वापरून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहज व्यवहार करू शकतात. ज्यांच्याकडे फीचर फोन आहेत त्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

जाणून घ्या यूएसएसडी तंत्रज्ञान काय आहे?

यूएसएसडी हे एक तंत्रज्ञान मंच आहे ज्याद्वारे मूलभूत फोनवर जीएसएम नेटवर्कद्वारे माहिती प्रसारित केली जाऊ शकते. हे सर्व मोबाईल फोनवर एसएमएस सुविधेसह उपलब्ध आहे. यूएसएसडी मोबाइल बँकिंगचा वापर निधी हस्तांतरित करण्यासाठी, खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी, बँक स्टेटमेंट तयार करण्यासाठी, इत्यादीसाठी केला जाऊ शकतो.

Share.