2022 Hero Super Splendor Canvas

हिरो मोटोकॉर्पने आपल्या १२५ सीसी बाइक ‘सुपर स्प्लेंडर’चा नवा वेरिएंट लाँच केला आहे. याची शोरूम किंमत 77,430 रुपये आहे. कंपनीने सोमवारी सांगितले की, सुपर स्प्लेंडर कॅनव्हास ब्लॅक एडिशन दोन ट्रिममध्ये लाँच करण्यात आले आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 77,430 रुपये आणि 81,330 रुपये आहे.

एक लीटर इंधनात ही बाईक 60 ते 68 किलोमीटर प्रवास करू शकते, असा कंपनीचा दावा आहे. सुपर स्प्लेंडर 125 च्या या नव्या व्हेरिएंटमध्ये बीएस 6 124.7 सीसी, सिंगल सिलिंडर, एअर कूल्ड इंजिन असणार आहे.

इतर वैशिष्ट्यांमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स, फाइव्ह स्टेप अॅडजस्टेबल रियर स्प्रिंग्स आणि सध्याच्या व्हेरिएंटप्रमाणे दोन्ही चाकांवर १३० मिमी ड्रम ब्रेकचा समावेश आहे. याशिवाय मोटारसायकलवर २४० एमएम फ्रंट डिस्क ब्रेकचा पर्याय असलेली कंबाइन ब्रेकिंग सिस्टिमही उपलब्ध असेल.

Share.