honda activa केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानावर देशातील ऑटो कंपन्यांनी गांभीर्याने काम करावे, असे आवाहन केले होते. होंडा मोटरसायकल्स अँड स्कूटर इंडियाकडेHonda Motorcycles and Scooter India आता फ्लेक्स फ्युएलची सविस्तर योजना आहे. होंडा अॅक्टिव्हा किंवा अन्य कोणत्याही मोटारसायकलमध्ये नजिकच्या भविष्यात फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजी दिसण्याची शक्यता आहे. म्हणजेच मोटारसायकल पेट्रोलऐवजी इथेनॉल किंवा इतर कोणत्याही पर्यायी इंधनावर चालू शकेल.

पेट्रोलमध्ये किती इथेनॉल मिसळता येईल याचा अभ्यास कंपनी करत आहे. वाहन आणि इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेणेही गरजेचे आहे. ही कंपनी गेल्या १० वर्षांपासून ब्राझीलमध्ये फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानाचा वापर करत असून, तेथे तिला मोठे यश मिळाले आहे. होंडाने आतापर्यंत 7 दशलक्षाहून अधिक फ्लेक्स-फ्यूल टू-व्हीलरची विक्री केली आहे.

Honda activa

2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता
होंडा 2024 मध्ये भारतात फ्लेक्स-फ्युएलवर चालणारी दुचाकी वाहने बाजारात आणण्याची शक्यता आहे. अजूनही काम सुरू असून कंपनी सध्या इलेक्ट्रिक बाईक आणि बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे.

फ्लेक्स इंधनामुळे खर्च वाचेल
फ्लेक्स फ्युएल इंजिनमुळे वाहनाला एकापेक्षा अधिक इंधन वापरता येणार आहे. फ्लेक्स फ्युएल इंजिनमुळे पेट्रोल तसेच इथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी आणि इलेक्ट्रिक पॉवरचा वापर वाहनात इंधन म्हणून करता येतो. हे हायब्रीड इंजिन म्हणून ओळखले जाऊ शकते.

फ्लेक्स फ्युएल इंजिन आल्याने लोकांना इथेनॉलवर आपली वाहने चालवता येणार आहेत. इथेनॉलची किंमत प्रतिलिटर ६५ रुपये आहे. पेट्रोलचे दर सध्या शेकडोच्या घरात आहेत. एक लिटर इथेनॉल तब्बल ८०० ग्रॅम पेट्रोलचे काम करते. अशा प्रकारे वाहनांमध्ये फ्लेक्स फ्युएलचा पर्याय उपलब्ध झाला तर. पेट्रोलची किंमत प्रतिलिटर २० रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.

Share.