Ahmednagar news अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी वीज वितरण कंपनीकडून शटडाऊन घेण्यात येणार आहे. शनिवारी (ता.२०) हा बंद असणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, स्टेशन रोड, सारसनगर, विनायक नगर, मुकुंदनगर, केडगाव, अहमदनगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसराला शनिवारी (ता. २०) पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

Ahmednagar news

Ahmednagar या भागाला साेमवारी पाणीपुरवठा


अहमदनगर शहराच्या भागास म्हणजेच मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टिव्ही सेंटर हाडको, लॉईड बिशप कॉलनी या भागाला रविवारऐवजी सोमवारी (ता. २२) पाणीपुरवठा हाेईल.

Ahmednagar या भागाला मंगळवारी पाणीपुरवठा


शहरातील सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्ली दरवाजा, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, आनंदी बाजार, कापड बाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी परिसर भागाला साेमवारऐवजी मंगळवारी (ता. २३) पाणीपुरवठा हाेईल.

Share.