India vs Pakistan Live  लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टारवर केले जाणार आहे. याचा अर्थ असा, तुम्ही डिस्ने + हॉटस्टारद्वारे तुमच्या फोनवर कधीही, कुठेही सामन्याचा आनंद घेऊ शकता. यासाठी, तुम्ही डिस्ने + हॉटस्टार मोफत सबस्क्रिप्शन देणार्‍या योजना घेऊ शकता. Jio, Airtel आणि Vi च्या अशा योजनांची माहिती देणार ​​आहोत, जिथे डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन आणि अनेक फायदे मिळतील.

India vs Pakistan Live : Disney+ Hotstar

Jio: जर तुम्ही जिओ युजर्स असाल तर तुमच्यासाठी अनेक प्लान्स आहे. यात डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. तुम्ही जिओचा ६०१ रुपयांचा प्लान खरेदी करू शकता ज्याची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटाही दिला जात आहे. याशिवाय ६ जीबी अतिरिक्त डेटाही मिळेल आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे.

Airtel: एअरटेल युजर्स डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी ५९९ चा रिचार्ज प्लान घेऊ शकता. याची वैधता २८ दिवस आहे आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. त्याचबरोबर ८३८ रुपये डिस्ने + हॉटस्टारच्या विनामूल्य प्लानदेखील आहे. या प्लानची ​​वैधता ५६ दिवसांची आहे.

Vodafone Idea: व्होडाफोन आयडियाबद्दल सांगायचे तर, कंपनी ६०१ रुपयांच्या प्लानसह यूजर्सना मोफत डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देत आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा आणि १० एसएमएस देखील दिले जात आहेत. कंपनीचा दुसरा प्लान ९०१ रुपयांचा आहे आणि त्याची वैधता ७० दिवसांची आहे. डिस्ने + हॉटस्टार फ्री सब्सक्रिप्शन, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग देखील या प्लानमध्ये मिळते.

Share.