IPL 2022 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला असून या सामन्यात कोलकाताने विजय मिळविला आहे. या मोसमाचा दुसरा दिवस हा डबल हेडर सामन्यांचा असणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दोन सामने होणार आहेत. दुसऱ्या दिवशी पहिला सामना लीगमधील सर्वात यशस्वी संघ मानल्या जाणार्‍या मुंबई इंडियन्स Delhi Capitals vs Mumbai Indians संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे. तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली पहिल्या विजेतेपदाच्या शर्यतीत आहे. त्याच वेळी, रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई सहाव्या आयपीएल विजेतेपदासाठी दावा सादर करेल. दिल्लीने 2020 मध्ये फायनल खेळली पण मुंबईने त्यांना पराभूत करून विजेतेपद आपल्या नावावर केले होते.मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. सामन्याचा नाणेफेक दुपारी 3 वाजता होईल, तर 3.30 वाजता सामना सुरू होईल.

IPL 2022

दिल्ली आणि मुंबईचे हेड टू हेड रेकॉर्ड – आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये मुंबईच्या संघाने 16 सामने जिंकले आहेत, तर दिल्लीने 14 सामने जिंकले आहेत. विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या शेवटच्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले होते आणि त्या दोन्ही सामन्यांमध्ये दिल्ली संघाने विजय मिळवला होता. तर IPL 2020 मध्ये दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले आणि मुंबईने सर्व सामने जिंकले होते.

मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेव्हिस , टिळक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, नमोलप्रीत सिंग, इशान किशन, आर्यन जुयाल, किरॉन पोलार्ड, डॅनियन सॅम्स, संजय यादव, टीम डेव्हिड, फॅबियन ऍलन, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, अर्शद खान, जयदेव उनाडकट, रिले मेरेडिथ, बेसिल थम्पी, मयंक मार्कंडेय, मुरुगन अश्विन

दिल्ली कॅपिटल्सचा संघ – ऋषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंग, यश धुल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, अश्विन हेब्बर, चेतन साकारिया, एनरिक नोरखिया, खलील अहमद, कमलेश नागरकोटी, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, शार्दुल ठाकूर, कमलेश नागरकोटी, अक्षर यादव, ललित यादव, रिपल पटेल, विकी ओट्सवाल, मिचेल मार्श, केएस भरत, टीम सेफर्ट, कुलदीप यादव, प्रवीण दुबे

Share.