Jio Recharge Plans अनेक मोठ्या कंपन्या नेहमी 1 रुपयाची प्रचंड सूट देतात आणि 999/-, 499/- सारखे विचित्र भाव ठेवतात, आता तुम्हालाही प्रश्न पडला आहे की मी या 1 रुपयात कोणता बंगला बांधणार? पण प्रत्यक्षात ही कंपन्यांची मोठी युक्ती आहे. अनेक कंपन्यांचा असा दावा आहे की, जेव्हा संपूर्ण संख्या पाहण्याऐवजी ९ मध्ये संपणारी किंमत आकारली जाते तेव्हा ग्राहकांकडे अधिक लक्ष दिले जाते. या अलिखित नियमाला अनुसरून आता जिओकडूला एक आश्चर्यकारक ऑफर देण्यात आली आहे. ७५० रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे जिओला आता युजर्सकडून ट्रोल केले जात आहे.

Jio Recharge Plans कसा आहे जिओचा नवा रिचार्ज पॅक?


इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, “रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, ओटीटी सब्सक्रिप्शन आणि 2 जीबी डेली डेटा 90 दिवसांची वैधता फक्त 750 रुपयांमध्ये देण्यात आली आहे. हा प्लान टॉप ट्रेंडिंग रिचार्ज पॅकपैकी एक आहे.

आता ग्राहकांना फायदा व्हावा यासाठी जिओने नुकताच प्लानमध्ये बदल करत 1 रुपयाचा पूर्ण डिस्काउंट दिला आहे. जिओला अवघ्या ७४९ रुपयांत हा प्लॅन मिळू लागल्यापासून नेटकऱ्यांनी रिलायन्सला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, प्लानमध्ये 1 रुपयाच्या बदलामुळे जिओ युजर्संना अतिरिक्त 100 एमबी डेटा वापरता येणार नाही. 750 प्लॅन जिओ 1 रुपयात अतिरिक्त 100 एमबी डेटा देत होता. पण आता 749 रुपयांसह युजर्संना एक्स्ट्रा डेटा मिळणार नाही.

Share.