KGF Chapter 2 Trailer कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार यशचा (Yash) याचा बहुचर्चीत चित्रपट ‘केजीएफ-2’ (K G F 2) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यश, संजय दत्त (Sanjay Dutt) , रवीना टंडन (Raveena Tandon) हे कलाकार या सिनेमात पहायला मिळणार आहेत. यश, संजय दत्त, रवीना टंडन आणि चित्रपटाचा निर्माता करण जोहर (Karan Johar) यांनी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. मागच्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची सिनेरसिक वाट पाहत आहेत. हा सिनेमा याआधी मागच्या वर्षी रिलीज होणार होता. पण त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अखेर आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता अखेर हा सिनेमा हा चित्रपट 14 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
ट्रेलर रिलीज
KGF Chapter 2 Trailer
कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार यशचा याचा बहुचर्चीत चित्रपट ‘केजीएफ-2’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात यशची कम्माल अॅक्टिंग भाव खावून जाते. शिवाय संजय दत्तचा हा लूकही किलर आहे. या चित्रपटात संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे तर रवीना टंडन रामिका सेन नावाच्या नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे हा अॅक्शन मुव्ही बॉक्सऑफिसवरही कमाल करणार आहे.