Mahindra Electric महिंद्रा अँड महिंद्राने गुरुवारी आपल्या नव्या ऑल-इलेक्ट्रिक एक्सयूव्ही 400 चे अनावरण केले. एका दिमाखदार सोहळ्यादरम्यान या कारची ओळख झाली. ऑगस्टमध्ये खुद्द आनंद महिंद्रा यांनी सप्टेंबरमध्ये ही कार लाँच करण्याची घोषणा केली होती. डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ बॅटरी आणि सनरूफसह अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या या कारचे बुकिंग जानेवारी 2023 मध्ये सुरू होईल आणि त्यानंतरच त्याची किंमतही समोर येईल.

महिंद्राच्या या ईव्हीमध्ये कंपनीने इलेक्ट्रिफाइड ट्विन पीकेड लोगो दिला आहे. वेगाबद्दल बोलायचे झाले तर अवघ्या चार सेकंदात ० ते ६० किलोमीटरचा वेग पकडतो आणि ८.३ सेकंदात ० ते १०० किलोमीटरचा वेग पकडण्यास सक्षम आहे. महिंद्राची ही इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन ईव्हीला भारतीय बाजारात तगडी टक्कर देऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पहिल्या टप्प्यात ही एसयूव्ही देशातील 16 शहरांमध्ये लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, हैदराबाद, दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, कोलकाता, चेन्नई, पुणे, अहमदाबाद, गोवा, जयपूर, सुरत, नागपूर, त्रिवेंद्रम, नाशिक, चंदीगड, कोची यांचा समावेश आहे.

महिंद्राच्या या ईव्हीमध्ये कंपनीने इलेक्ट्रिफाइड ट्विन पीकेड लोगो दिला आहे. वेगाबद्दल बोलायचे झाले तर अवघ्या चार सेकंदात ० ते ६० किलोमीटरचा वेग पकडतो आणि ८.३ सेकंदात ० ते १०० किलोमीटरचा वेग पकडण्यास सक्षम आहे. महिंद्राची ही इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन ईव्हीला भारतीय बाजारात तगडी टक्कर देऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सनरूफसोबत सादर करण्यात आलेल्या या कारचा टॉप स्पीड ताशी १५० किलोमीटर आहे. ही कार इन्फिनिटी ब्लू कलरमध्ये शानदार लूकसह सादर करण्यात आली आहे. रेंजमध्ये या सेगमेंटच्या कारपेक्षा या कार पुढे आहेत. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 456 किलोमीटरपर्यंत प्रवास करता येईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कारमधील बॅटरी डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. यात आयपी ६७ प्रमाणपत्र आहे. गाडीतील बूट स्पेस 418 लीटर म्हणजेच प्रवासादरम्यान पाय पसरून आरामात प्रवास करता येतो.

महिंद्रा एक्सयूव्ही ४०० ईव्ही पाच रंगात उपलब्ध असेल – आर्क्टिक ब्लू, एव्हरेस्ट व्हाईट, गॅलेक्सी ग्रे, नेपोली ब्लॅक आणि इन्फिनिटी ब्लू कलरमध्ये ड्युअल टोन रूफ पर्यायांसह सॅटिन कॉपर फिनिश. सी-सेगमेंटमधील ही सर्वात वाइड कार आहे. त्याची एकूण लांबी ४२०० मिमी, तर रुंदी १८२१ मिमी आहे. याशिवाय एक्सयूव्ही 400 ईव्हीमध्ये स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, ओटीए सॉफ्टवेअर अपडेट्स आणि अनेक ड्रायव्हिंग मोडसह 60 हून अधिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.

Share.