Monsoon Update आजपासुन चा नवीन हवामान अंदाज राज्यात पुढील चार दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (panjab dakhva havaman) पडणार असुन या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका वर्तविण्यात आला आहे.

हवामान विषयक 8 ऑगस्ट पासुन चा पुढील हवामान अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला असुन येत्या पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.

आज दि. 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी राहणार असून नदी नाले ओसंडून वाहतील इतका पाऊस पडणार आहे.

हा पाऊस राज्यातील सर्वच जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात पडणार असुन मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, उत्तर महाराष्ट्र, व कोकण विभागात सर्वाधिक पडणार आहे.

याबरोबर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातील काही गावात मुसळधार ते अतिमूसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता यावेळी त्यांनी वर्तवली आहे.

तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी व आपली यंत्र सामग्री सुरक्षित स्थानी ठेवण्याचे आणि आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Share.