नगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सालाबादप्रमाणे श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा, श्री क्षेत्र त्रंबकेश्वरवरुन श्री क्षेत्र पंढरपुर पायी जाणारा दिंडी सोहळा शुक्रवार दिनांक २४/०६/२०२२ व दिनांक २५/०६/ २०२२ या दोन दिवसांकरीता मुक्कामासाठी थांबणार आहे. दिनांक २६/०६/२०२२ रोजी प्रस्थान करणार आहे. या दिंडी बाजार समितीच्या भुसार व फळे भाजीपाला यार्डवर दोन दिवस मुक्कामी असून दिंडीमध्ये सुमारे ५० हजार वारकरी सहभागी आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक २४/०६/२०२२ ते रविवार दिनांक २६/०६/२०२२ या तीन दिवसांकरीता समितीच्या मुख्य बाजाराचे भुसार व फळे भाजीपाला बाजार बंद राहणार आहे. तसेच शनिवार दिनांक २५/०६/२०२२ रोजी नेप्ती उपबाजार येथील कांदा लिलाव बंद राहणार आहे.सोमवार दिनांक २७/०६/२०२२ रोजीपासून भुसार, फळे भाजीपाला व कांदा बाजार नियमित चालु राहील. त्यामुळे भुसार व कांदा फळे भाजीपाला उत्पादक सर्व शेतकरी बांधवानी सदरचे बंद कालावधीमध्ये आपला शेतमाल यार्डवर विक्रीस आणू नये असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे प्रशासक . किशन रावसाहेब रत्नाळे साहेब यांनी केले आहे. यावेळेस समितीचे सचिव श अभय भिसे, सहा सचिव  बाळासाहेब लबडे, सहा सचिव  सचिन सातपुते व सहा सचिव  संजय काळे, भुसार विभागप्रमुख  सयाजी कराळे, भाजीपाला विभाग प्रमुख  भाऊ कोतकर हे उपस्थित होते.

Share.