New Maruti Suzuki Swift Features: नव्या जनरेशनच्या मारुती सुझुकी स्विफ्टची टेस्टिंग सुरू झाली आहे. तिचे काही फोटो लीक झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार या हॅचबॅकचे नवीन मॉडेल 2022 च्या अखेरीस ग्लोबल मार्केटमध्ये येऊ शकते किंवा 2023 च्या सुरुवातीला लॉन्च केले जाऊ शकते.

New Maruti Suzuki Swift Features
नवीन सुझुकी स्विफ्टच्या लीक झालेले फोटोंमध्ये या कारची डिझाइन आणि फीचर्सचा अंदाज येतो. रिपोर्ट्सनुसार अपकमिंग सुझुकी स्विफ्ट माइल्ड हायब्रीड पॉवरट्रेन आणि अपडेटेड इंटीरियरसह ऑफर केली जाईल. येथे आम्ही नवीन स्विफ्टच्या 5 विशेष फीचर्सविषयी माहिती देत आहोत.
मारुती सुझुकीची नवीन स्विफ्ट लाइटवेट HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते. यासह यात अल्ट्रा आणि अॅडव्हान्स हाय स्ट्रेंथ स्टील्स वापरले गेले आहे. यामुळे कारचे ड्रायव्हिंग परफॉर्मन्स आणि मायलेज सुधारेल.
रिपोर्ट्सनुसार नवीन मारुती स्विफ्ट 1.2L K12N डुअलजेट पेट्रोल इंजिनसह सादर केली जाऊ शकते. तसेच यात एक माइल्ड हायब्रीड तंत्रज्ञान प्रणाली देखील दिली जाऊ शकते. या कारचे इंजिन 89bhp ची कमाल पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. यासोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.
नवीन जनरेशन अपडेटसह स्विफ्ट मॉडेल लाइनअप सीएनजीव्हेरियंटसह देखील ऑफर केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार नवीन मॉडेल 1.2L ड्युअलजेट पेट्रोल मोटर आणि फॅक्टरीफिट सीएनजी किटसह ऑफर केले जाऊ शकते.
नवीन स्विफ्टमधील बहुतेक कॉस्मेटिक बदल फ्रंट एंडवर केले जातील. यात नवीन एलईडी एलिमेंट्स, नवीन फ्रंट ग्रिल आणि अपडेटेड बंपरसह स्लीक हेडलॅम्प मिळतील. याशिवाय फॉग लॅम्प असेंब्लीमध्ये नवीन सीआकाराचे एअर स्प्लिटर असतील. इतर डिझाईन हायलाइट्समध्ये मोठे आणि ड्युअलटोन अलॉय व्हील, नवीन बॉडी पॅनेल्स, ब्लॅकआउट पिलर, रूफ माउंटेड स्पॉयलर आणि फॉक्स एअर व्हेंट्ससह व्हील आर्च यांचा समावेश असेल.
023 Suzuki Swift मध्ये नवया डिझाइनचा डॅशबोर्ड, अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम आणि नवीन प्रकारच्या सीटसह अनेक नवीन फीचर्स असण्याची अपेक्षा आहे.

Share.