news on stock market सध्या शेअरमार्केटमध्ये अनेक चढ-उतार चालू आहेत. काल काही शेअर्सने अनपेक्षितपणे ब्रेकआउट दिला. त्यानंतर आजही अनेक शेअर तेजीत होते. अशातच आता आम्ही तुम्हाला अशा २ शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या शेअर्समुळे अनेक लोक करोडपती झाले. या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गुंतवणुकदारांनी संयम ठेवला म्हणून त्यांना अगदी कोट्यवधी रुपये मिळाले. आज ज्या शेअर्सविषयी सांगणार आहोत, त्याच्यात झालेली वाढ पाहून तुम्ही शॉक व्हाल.
यातील पहिला शेअर आहे श्री सिमेंट. ही कंपनी जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हा या कंपनीचे शेअर्स खूप कमी पैशात मिळत होते. आता मात्र याची किंमत तगडी झाली आहे. २००१ पासून आजवरचा विचार करता मागील 21 वर्षात श्री सिमेंटने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 770 पटीने पैशांचा परतावा दिला आहे. श्री सिमेंट हा शेअर सध्या 23,480 रुपयांच्या आसपास आहे.
यातील दुसरा शेअर आहे सेरा सॅनिटरीवेअर. २००७ पासून विचार करता या शेअरनेही उत्तम परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने जर 15 वर्षापूर्वी 1 लाख रुपयांचे सेरा सॅनिटरीवेअरचे शेअर्स घेतले असतील तर त्याचे आता 1.57 कोटी रुपये झाले असते. अजून एक विशेष बाब म्हणजे या शेअरने मधल्या काळात बोनस शेअर्सही वाटले आहेत. या शेअरची किंमत आता 5560 रुपयांच्या आसपास आहे.
वरती सांगितलेले दोन्ही शेअर्स भविष्यात पण चांगला परतावा देऊ शकतात. मात्र शेअरमार्केट्चा अभ्यास करून आपण खरेदी करावी.

Share.