18 जूनपासून Amazon Monsoon Carnival Sale सुरु झाला आहे, याची सांगता 22 जूनला होईल. त्यामुळेNokia स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स मोठ्या डिस्काउंटसह विकत घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त तीन दिवस उरले आहेत. जर तुम्ही बजेट फ्रेंडली स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर अशा अनेक डील्स अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध झाल्या आहेत. यातील एक ऑफर म्हणजे आज Nokia G21 स्मार्टफोन तुम्ही 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता.

Nokia G21 वरील जबरदस्त ऑफर्स

Nokia G21 स्मार्टफोन जेव्हा लाँच झाला होता तेव्हा याची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली होती. परंतु या सेलमध्ये अ‍ॅमेझॉनवरून याची विक्री फक्त 12,999 रुपयांमध्ये केली जात आहे. याची खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्ही 1,000 रुपयांची बचत करू शकता. त्यामुळे या फोनची किंमत 11,999 रुपये होईल.

Nokia G21 वर सर्वात मोठी अर्थात 10,050 रुपयांची बचत एक्सचेंज ऑफर अंतर्गत करता येईल. इथे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन ही ही सूट मिळवू शकता. त्यासाठी योग्य स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. जर पूर्ण सवलत मिळाली तर शानदार Nokia G21 स्मार्टफोन तुम्ही फक्त 1,949 रुपयांमध्ये घरी आणू शकता.

Nokia G21 चे स्पेसिफिकेशन्स

Nokia G21 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात Unisoc T606 प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे, सोबत ग्राफिक्ससाठी Mali G75-MP1 जीपीयू मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम मिळतो, त्याचबरोबर 64GB आणि 128GB चे दोन स्टोरेज ऑप्शन आहेत. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. नोकियाचा स्मार्टफोनमध्ये Android 11 वर चालतो. यात 5,050mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जसह देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप देते, असा दावा कंपनीनं केला आहे.

Share.