Nothing Phone आज लाँच होणार आहे. जागतिक बाजारात फोन लाँच होत असला तरी सर्वातआधी भारतात याच्या सेलची घोषणा केली आहे. लाँचआधी फोनची किंमत आणि फीचर्स समोर आले आहे. रिपोर्टनुसार, भारतात फोनची किंमत ३४,९९९ रुपये असू शकते. फोनमध्ये ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा दिला जाईल, ज्यात सोनी IMX७६६ सेंसरचा उपयोग केला आहे. एका ट्विटर यूजरने स्क्रीनशॉट शेअर करत फोनच्या स्टोरेज व्हेरिएंटबाबत माहिती दिली आहे. फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येईल. फोन पांढऱ्या रंगात येईल. फोन दोन स्टोरेज आणि ब्लॅक व व्हाइट रंगात येऊ शकतो. स्क्रीनशॉटमध्ये बॉक्स प्राइस ३९,९९९ रुपये आहे. तर सेलमध्ये फोन ३४,९९९ रुपयात उपलब्ध होईल.

https://platform.twitter.com/widgets.js

Nothing Phone (1) चे स्पेसिफिकेशन्स

लाँचआधीच Nothing Phone (1) चे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहे. फोनमध्ये ६.५५ इंच एमोलेड डिस्प्ले दिला जाईल, यात १२० हर्ट्ज अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट मिळेल. कंपनी फोनला अ‍ॅल्यूमिनियम फ्रेमसह सादर करू शकता. फ्रंटसोबतच बॅकला देखील ग्लास फिनिश दिला जाईल. नथिंगचा हा फोन ६ नॅनोमीटर फॅब्रिकेशन बेस्ड क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी+ ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येईल. यात ६ जीबी / ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी / २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळेल. फोन अँड्राइड १२ ओएसवर करेल. यात नथिंग यूआयचे लेयरिंग असू शकते.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ५० मेगापिक्सल ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. याचा मुख्य सेंसर Sony IMX७६६ असू शकतो. सोबतच, अल्ट्रा-वाइड अँगल लेंस मिळेल. तसेच, OIS आणि EIS चा सपोर्ट दिला जाईल. या ५जी फोनमध्ये ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४७०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन १२ जुलैला जागतिक बाजारात लाँच होईल. नथिंगचा हा पहिला वहिला स्मार्टफोन वनप्लस १०आर आणि आईकू ९एसईला टक्कर देईल.

[youtube https://www.youtube.com/watch?v=IfQaSYphyaI&w=560&h=315]
Share.