Ola Electric ओला इलेक्ट्रिकने हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकत देशातील नंबर 1 इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी बनली आहे. ओलाने भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात प्रवेश करून केवळ 5 महिने झाले आहेत. गेल्या महिन्यात मात्र ओला इलेक्ट्रिकने विक्रीच्या बाबतीत हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकले. ओला इलेक्ट्रिकने हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकत देशातील नंबर 1 इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी बनली आहे. ओलाने भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात प्रवेश करून केवळ 5 महिने झाले आहेत. गेल्या महिन्यात मात्र ओला इलेक्ट्रिकने विक्रीच्या बाबतीत हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकले.

electric vehicles अलीकडेच ओलाच्या स्कूटरला Ola आग लागली, याशिवाय अनेक युझर्सनी सोशल मीडियावर ड्रायव्हिंग रेंज, स्कूटरच्या परफॉर्मन्ससह काही त्रुटी शेअर केल्या. मात्र, असे चित्र असतानाही ओलाने विक्रीत सर्वांना मागे टाकले आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिकने एप्रिलमध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली. ओलाने एप्रिलमध्ये १२,६८३ युनिट्सची विक्री केली. हिरो इलेक्ट्रिकची विक्री ५० टक्क्यांनी घटून केवळ ६,५७० युनिटवर आली आहे. एप्रिलमध्ये या कंपनीचा तिसरा क्रमांक लागला होता. दुसरा क्रमांक ओकिनावा ऑटोटेकला मिळाला. कंपनीने 10,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली आहे.

Ola Electric ने Ola S1 आणि Ola S1 Pro स्कूटरची किंमत ८५ हजार ते १.१० लाख रुपये ठेवली आहे. Ola S1 ची महाराष्ट्रात किंमत ९४,९९९ रुपये, राजस्थानमध्ये ८९,९६८ रुपये आणि गुजरातमध्ये ७९,९९९ रुपये आहे. Ola S1 Pro ची महाराष्ट्रात किंमत १,२४,९९९ रुपये, गुजरातमध्ये १,०९,९९९ रुपये आणि राजस्थानमध्ये १,१९,१३८ रुपये आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ईव्ही कंपनीची प्रतिमा खालावली असताना ओला इलेक्ट्रिकने ही कामगिरी केली आहे, हे उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे, Hero Electric हा ब्रँड EV आगीच्या घटनेच्या वादापासून दूर राहिला आहे.

Share.