जगभरातील सर्वात मोठ्या कंपन्यांची धुरा भारतीय लोकांच्या हातात आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅडोब, पालो अल्टो नेटवर्क अशा जगप्रसिध्द कंपन्यांच्या सीईओ पदावर भारतीय व्यक्ती कायर्रत आहेत. निकेश अरोरा, सत्या नदेला, शंतनू नायायण, सुंदर पिचई हे सर्वजण जगभरात त्यांच्या कामगिरीने भारताची मान उंचावत आहेत. निकेश अरोरा ते सुंदर पिचई त्यांच्या कंपन्यांची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.

सुंदर पिचई : गुगल
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलच्या सीईओ पदावर सुंदर पिचई कार्यरत आहेत. 2004 मध्ये त्यांनी गुगलसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. सुंदर पिचई यांची अल्फाबेट कंपनीच्या सीईओ पदावर बढती झाली आहे. लॅरी पेज अँड सेरेजी ब्रीन कंपनी सोडल्यानंतर ते गुगलसोबत काम करु लागले होते. सुंदर पिचई यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला होता. पिचई यांनी आयआयटी, खरगपूरमधून शिक्षण घेतले. त्यानंतर ते स्टॅनफोर्ड विद्यापीठ कॅलिफोर्निया येथे पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले होते.

निकेश अरोरा : पालो अल्टो नेटवर्क
उत्तर प्रदेशात जन्म झालेले निकेश अरोरा पालो अल्टो नेटवर्क कंपनीचे 2018 पासून सीईओ म्हणून कार्यरत आहेत. गुगलमध्ये काम केल्यानंतर निकेश अरोरांनी सॉफ्टबँक ग्रुपमध्ये 2014 पासून अध्यक्ष म्हणून काम केले आहे. निकेश अरोरांनी त्यांचं शिक्षण आयआयटी, भुवनेश्‍वरमध्ये पूर्ण केले. त्यानंतर ते बोस्टन कॉलेज, नॉर्थईस्टर्न विद्यापीठात शिकण्यासाठी गेले.

सत्या नडेला : मायक्रोसॉफ्ट
प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओपदावर सत्या नडेला 2014 पासून काम करत आहेत. सत्या नडेला यांनी त्यांचे शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण केले. कॉम्प्युटर इंजिनीअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर ते एम.एससी करण्यासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतील विस्कॉन्सीन-मिलावूकी विद्यापीठातून त्यांनी एम.एससी पदवी पूर्ण केली. सत्या नडेला यांचा जन्म तेलुगू कुटंबामध्ये झाला आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यापूर्वी सत्या नडेला सन मायक्रोसिस्टीम्समध्ये कार्यकरत होते.

शंतनू नारायण : अ‍ॅडोब
शंतनू नारायण सध्या जगप्रसिद्ध अ‍ॅडोब या कंपनीच्या सीईओ पदावर काम करत असून ते हैदराबादचे आहेत. 2007 पासून ते अ‍ॅडोबचे चेअरमन आणि सीईओ म्हणून ते काम पाहत आहेत. शंतनू नारायण यांनी उस्मानिया विद्यापीठ, हैदराबादमधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून शंतून नारायण यांनी मास्टर ऑफ बिझनेस हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नारायण यांनी अ‍ॅडोबला जॉईन होण्यापूर्वी अ‍ॅपल कंपनीत काम केले आहे.

अरविंद कृष्णा – आयबीएम
आंतरराष्ट्रीय कॉम्प्युटर हार्डवेअर कंपनी ‘आयबीएम’च्या ‘सीईओ’पदी भारतीय वंशाचे अरविंद कृष्णा आहेत. त्यांच्या अगोदर ‘वर्जिनिया रोमेटी’ हे होते. रोमेटी यांनी निवृत्ती घेतल्यामुळे 2021 पासून त्यांचा पदभार श्री. कृष्णा यांच्याकडे आला. श्री. कृष्णा यापूर्वी ‘क्लाउड’ आणि ’कॉग्निटिव्ह’ सॉफ्टवेअरसाठी आयबीएममध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष होते. 57 वर्षीय कृष्णा यांनी वर्ष 1990 मध्ये आयबीएममध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले असून, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये युनिवर्सिटी ऑफ इलिनोइसमधून पीएचडी केली आहे.

रंगराजन रघुराम – व्हीएमवेअर
क्लाउंड आणि व्हर्च्युलायझेशन कंपनी ‘व्हीएमवेअर’च्या सीईओपदी रंगराजन रघुराम यांची निवड केली. 2003 ला ‘व्हीएमवेअर’ मध्ये जॉईन झाल्यापासून रघुराम यांनी कंपनीची दिशा ठरवणे आणि तंत्रज्ञानात क्रांती आणण्यासाठी मदत केली आहे. त्यांनी व्हर्ज्युलायझेशन बिझनेस वाढवणे, डेटा सेंटरबाबत धोरण ठरवणे, कंपनीच्या क्लाउड कॉम्प्युटिंग बिझनेसला मार्गदर्शन करणे, सॉफ्टवेअर सेवात बदल यासोबतच डेल टेक्नोलॉजी सोबत भागीदारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. रघुराम यांनी मुंबईमधील आयआयटीमधून पदवी घेतली आहे. त्यानंतर 1994 साली ते एमबीए करण्यासाठी व्हार्टनला गेले. बँग नेटवर्क्स आणि नेटस्केपमध्ये काही काळ काम केल्यानंतर ऑगस्ट 2003 मध्ये ते ‘व्हीएमवेअर’ध्ये जॉईन झाले.

पराग अग्रवाल – ट्वीटर
ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाचे अमेरिकन आयआयटी मुंबईचे पदवीधर पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीईओ जॅक डोरसी यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरच्या संचालक मंडळाने एकमताने अग्रवाल यांनी या पदावर निवड केली. अग्रवाल यांच्या निवडीमुळे आता जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एका कंपनीच्या नेतृत्त्वाची जबाबदारी भारतीयाकडे सोपविण्यात आली आहे.

अग्रवाल हे एका दशकापासून ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. सॉफ्वेअर इंजिनीअर म्हणून त्यांनी ट्विटरची नोकरी स्वीकारली. त्यानंतर ते 2017 मध्ये ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्त झाले. या काळात त्यांनी ट्विटरच्या तंत्रज्ञानविषयक धोरणात आमूलाग्र बदल करत मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून यूजर्सचा अनुभव अधिक समृद्ध केला. याचबरोबर उत्पन्नातही वाढ करण्यास मदत केली. यामुळे जॅक यांच्यानंतर अग्रवाल यांनी नियुक्ती करण्यात आली.

पराग अग्रवाल हे भारतीय असून त्यांनी आयआयटी मुंबईतून बीटेकचे पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पूर्ण केले. यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्ट रीसर्च, एटी अ‍ॅण्ड टी आणि याहू रीसर्च यांसारख्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर सन 2011 मध्ये ते ट्विटरमध्ये रुजू झाले होते. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. या अगोदर सोशल मीडियाच्या खुल्या आणि विकेंद्रीत प्रमाणांची निर्मिती करण्यासाठी ओपनसोर्स आर्किटेक्ट विकसित करणार्‍या ट्विटरच्या ’प्रोजेक्ट ब्लूस्काय’ची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. या यशस्वी कामगिरीनंतर त्यांनी यापदी नियुक्ती करण्यात आली.

Share.