Personal Loan कर्ज घेताना , जितक्या कालावधी साठी (Loan ) कर्ज घेत आहोत तो संपूर्ण कालावधी आपण हफ्ते फेडण्यास सक्षम आहोत का?
कर्जाचा व्याजदर काय आहे ? सध्या कार लोन साठी 8–9% , गृह कर्जासाठी 6.5 ते 8% , पर्सनल लोन साठी 10 ते 14 टक्के इतके व्याजदर चालू आहेत.
तुम्हाला बँक किंवा पतसंस्था अवास्तव दर तर आकारत नाही ना याची खात्री करा.
नवीन कर्ज घेताना आधीच आपल्याला कोणते आणि किती कर्जाचे हफ्ते चालू आहेत याची खात्री करा.
कोणत्याही स्थितीत (Loan ) कर्जाच्या मासिक हफ्त्यांची रक्कम मासिक उत्पन्नाच्या 50–55% वर जाऊ देऊ नका.
समजा मासिक उत्पन्न ५०००० असेल तर 25 ते 30 हजाराच्या आतच तुमचे घर, गाडी, क्रेडीट कार्ड यांचे हफ्ते असले पाहिजेत.
कारण दरमहा तुम्हाला लाईट बिल, किराणा, दुध , मुलांची शिक्षणे इतर घर खर्चे असणारच
अति दीर्घ मुदतीचे (Loan ) कर्ज काढू नका . समजा तुम्ही 30 वर्षांचे आहात तर 30 वर्षांचे होम लोन काढणे म्हणजे साठी पर्यंत कर्जाचे हफ्तेच फेडत राहाल तर म्हातारपणाची तरतूद केव्हा करणार ?
किमान 50 शीच्या आत कर्ज मुक्त होऊन राहिलेली 10 वर्षे तरी पैसे साठवून म्हातारपणात काम करावे लागणार नाही आरामात जगताल असे पहा .