Rakesh Jhunjhunwala Passes Away : शेअर बाजारातील (Share bazar) बिगबुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना 2-3 आठवड्यांपूर्वी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी  सकाळी 6.45 वाजता त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे

राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफेट (Warren Buffett) म्हणूनही ओळखले जात होते. शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर बिग बुलने एअरलाइन ( Airline) क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि 7 ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे. महत्त्वाचे म्हणजे एवढी संपत्ती असलेल्या व्यक्तीचा प्रवास केवळ 5 हजार रुपयांपासून सुरू झाला

शेअर बाजारची होती अचूक जाण

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे शेअर बाजारातील नफा आणि तोट्याची अचूक जाण होती. यामुळेच त्यांनी खरेदी केलेले स्टॉक मालामाल होतात असेही म्हटले जात होते. झुनझुनवाला हे एक व्यापारी आणि सीए होते. फोर्ब्सच्या यादीतील भारतीय श्रीमंतांच्या यादीत ते 48 व्या क्रमांकावर होते. हंगामा मीडिया आणि अ‍ॅपटेकचे ते चेअरमन देखील होती. तसेच व्हॉईसरॉय हॉटेल्स, कॉनकॉर्ड बायोटेक, प्रोवोग इंडिया आणि जिओजित वित्तीय सेवा या कंपन्यांच्या संचालकीय मंडळामध्येही त्यांचा समावेश होता

आता झुनझुनवालांची एकूण संपत्ती किती आहे?

राकेश झुनझुनवाला, ज्यांना भारताचे वॉरेन बफे म्हटले जाते, त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेअर बाजार आहे. झुनझुनवालांची ही यशोगाथा अवघ्या पाच हजार रुपयांपासून सुरू झाली. आज त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटींच्या आसपास आहे. या यशामुळे झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे असे संबोधले जाते. सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गमावत असतानाही झुनझुनवाला कमाई करण्यात यशस्वी झाले.

भारताचे वॉरेन बफेट (Warren Buffett) म्हणूनही ओळखले जात होते

Share.