‘सैराट’ (Sairat ) हा चित्रपट प्रदर्शित होऊन सहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. मात्र आजही हा चित्रपट आठवला की आर्ची अन् परश्याची जोडी डोळ्यांपुढे येते. ‘सैराट’ हा सिनेमा इतका गाजला की आजही या चित्रपटाची चर्चा होते. आर्ची अन् परश्या सुद्धा तितकेच चर्चेत असतात. आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) व परश्याची भूमिका वठवणारा आकाश ठोसर (Akash Thosar) सध्या मात्र एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहेत. होय, आकाश ठोसर रिंकूला काय नावानं हाक मारतो, याचा इतक्या वर्षानंतर खुलासा झाला आहे. होय, आकाशने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आणि यातून तो आर्ची अर्थात रिंकूला काय नावानं हाक मारतो, याचाही खुलासा झाला.

रिंकूचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ (Aathava Rang Premacha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. रिंकूच्या या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याची गोड बातमी आकाशने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली. शिवाय या चित्रपटासाठी रिंकुला मनापासून शुभेच्छाही दिल्यात. ‘Best Wishes Rajguru ’, असं त्यानं ही इन्स्टास्टोरी शेअर करताना त्यानं लिहिलं. यात त्याने रिंकूला टॅगही केलं. याच इन्स्टास्टोरीवरून आकाश रिंकुला ‘राजगुरू’ या नावाने हाक मारत असल्याचं उघड झालं.

काही महिन्यांपूर्वी रिंकू आकाशसोबत डिनर डेटवर गेली होती. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू होत्या. पण असं काहीही नसल्याचं रिंकूने लगेच स्पष्ट केलं होतं. मी अद्यापही सिंगल आहे, असं चाहत्यांशी संवाद साधताना तिने स्पष्ट केलं होतं.

काही महिन्यांपूर्वी रिंकू आकाशसोबत डिनर डेटवर गेली होती. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू होत्या. पण असं काहीही नसल्याचं रिंकूने लगेच स्पष्ट केलं होतं. मी अद्यापही सिंगल आहे, असं चाहत्यांशी संवाद साधताना तिने स्पष्ट केलं होतं.

‘सैराट’नंतर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर दोघंही एका रात्रीत स्टार झालेत. आता आर्ची व परश्या दोघंही कुठल्या कुठं पोहोचले आहेत. मराठी सिनेमाचं नाही तर हिंदी सिनेमा, हिंदी वेबसीरिजमधून दोघंही इंडस्ट्री गाजवत आहेत. रिंकूचं म्हणाल तर सैराटनंतर मेकअप, कागर या मराठी चित्रपटात ती झळकली. १००, अनपॉज्ड, २०० हल्ला हो या वेबसीरिजमध्ये दिसली. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटातही तिने भूमिका साकारली. आता तिचा ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा सिनेमा येत्या 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात रिंकू राजगुरू एका अ‍ॅसिड अ‍ॅटॅक झालेल्या मुलीची भूमिका साकारत आहे.

[youtube https://www.youtube.com/watch?v=u27wzQuTJx8]

Share.