SBI ही नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) क्लर्क भरती २०२२ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याद्वारे एसबीआयकडे लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी पदासाठी ५० हून अधिक रिक्त जागा आहेत. एसबीआय क्लर्क भरती २०२२ साठी ऑनलाइन अर्ज एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर केले जातील. एसबीआय क्लर्क भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २७ सप्टेंबर २०२२ रोजी बंद होईल. अर्ज भरण्यासाठी केवळ १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
एसबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, क्लर्क पदासाठी एकूण 5008 रिक्त जागा आहेत.महाराष्ट्र /मुंबई मेट्रो, महाराष्ट्र, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ /दिल्ली आणि उत्तर (एसबीआय क्लर्क भरती 2022) पूर्व येथे क्लार्क पदासाठी भरती होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त जागा आहेत. यानंतर लखनऊ आणि भोपाळमध्ये सर्वाधिक जागा आहेत.
एसबीआय क्लर्क पदासाठी कोणत्याही शाखेतील उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच एसबीआय भरतीसाठी यंदा नोव्हेंबरमध्ये प्राथमिक परीक्षा घेण्याची शक्यता आहे, तर मुख्य परीक्षा डिसेंबर 2022 किंवा जानेवारी 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे. या भारतीसंत्राची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया
भरण्यात येणाऱ्या जागा – लिपिक – कनिष्ठ सहकारी (कनिष्ठ सहकारी – ग्राहक सहाय्य व विक्री)
पद संख्या – 5008 पद
महाराष्ट्र – 797 पद
वयाची अट – २० ते २८ वर्षे
ऑनलाइन अर्ज कसा करावा
अर्ज सुरू होण्याची तारीख – ०७ सप्टेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ सप्टेंबर २०२२
निवड प्रक्रिया – (एसबीआय क्लर्क भरती 2022)
एसबीआय क्लर्क २०२२ निवड प्रक्रियेत दोन टप्प्यांचा समावेश आहे.
कदम क्र. 1 – प्रीलिम्स एक्झाम
कदम क्र. २ – मुख्य परीक्षा
एसबीआय क्लर्क 2022 परीक्षा वेळापत्रक
एसबीआय क्लर्क 2022 अधिसूचना – 06 सप्टेंबर 2022
एसबीआय क्लर्क ऑनलाइन अर्ज सुरू – ०७ सप्टेंबर २०२२
एसबीआय क्लर्क ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2022
पूर्व परीक्षा प्रशिक्षणाच्या तारखा –
प्राथमिक परीक्षेसाठी कॉल लेटर –
एसबीआय क्लर्क परीक्षा दिनांक 2022 (प्राथमिक) नोव्हेंबर 2022
एसबीआय क्लर्क परीक्षा दिनांक 2022 (मुख्य) डिसेंबर/नोव्हेंबर 2022 रोजी