आजच्या डिजिटल युगात पैसे ट्रान्सफर करणं खूप सोपं झालं आहे. SBI सह यूपीआय (Unified #Payment Interface) सुरू झाल्यापासून बँकिंग क्षेत्राला क्रांतीची चाहूल लागली आहे, असे आपण म्हणू शकतो. या डिजिटल पेमेंट पद्धतीमुळे आज बहुतांश ठिकाणी कॅशलेस व्यवहार केले जातात. आजूबाजूला पैसे ठेवण्याची गरज नाही, पैसे चोरीला जाण्याची भीती नाही, अशा अनेक समस्या या यूपीआयमुळे सुटल्या आहेत.

यूपीआय अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे आणि सर्वात वेगवान आणि विशेष पेमेंट पद्धतींपैकी एक बनली आहे. केवळ यूपीआयमुळे फोनपे, जीपे, पेटीएम, भीम अशा अनेक अॅप्सच्या मदतीने आणि बँकांच्या अधिकृत अॅपच्या मदतीने तुम्ही झटपट पैसे पाठवू शकता! तुम्ही एका दिवसात त्या माध्यमातून बरेच व्यवहार करता. पण तो एका मर्यादेपर्यंतचा व्यवहार वाटतो. पण ही मर्यादा बँकेवर अवलंबून असते, हे जाणून घेणं गरजेचं आहे.

कोणत्या बँकेचे किती लिमिट आहे, ते जाणून घेऊ..

State Bank Of India – भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट 1 लाख रुपयांपर्यंत आहे. याशिवाय, त्याचे डेली ट्रान्सझॅक्शन लिमिट देखील 1 लाख रुपये आहे.

HDFC Bank – खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँकेचे यूपीआय ट्रान्सझॅक्शन आणि लिमिट प्रत्येकी 1 लाख रुपये प्रति दिवस ठेवलं आहे. मात्र नवीन ग्राहक पहिल्या 24 तासांत फक्त 5,000 रुपयांचे ट्रान्सझॅक्शन करू शकतो.

Axis Bank – ॲक्सिस बँकेचे UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट आणि बँकेचे डेली लिमिट प्रत्येकी 1 लाख रुपयांपर्यंत आहे.

Punjab National Bank – पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ट्रान्सझॅक्शन लिमिट 25,000 रुपये तर दिवसाला यूपीआय लिमिट 50,000 रुपयांपर्यंत निश्चित केलंय.

Bank Of India – बँक ऑफ इंडिया या बँकेने UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट आणि एका दिवसाचं लिमिट 1 लाख रुपये सेट केलं आहे.

ICICI Bank – आयसीआयसीआय बँकेची UPI ट्रान्सझॅक्शन लिमिट आणि डेली लिमिटसुद्धा 10,000-10,000 रुपये आहे. मात्र Google Pay युझर्ससाठी या दोन्ही लिमिट 25,000 रुपये आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या  https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview

(बँकिंग नियमांमध्ये बदल झाल्यास वरील यूपीआय व्यवहार मर्यादा वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते.)

Share.