दुचाकी क्षेत्रातील प्रमुख Hero MotoCorp ने गुरुवारी आपली फ्लॅगशिप मोटारसायकल स्प्लेंडरचे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहे. दिल्लीत त्याची शोरूम प्राईज ७२,९०० रुपये आहे.
SplendorPlus XTEC हे नवीन व्हेरिएंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, पूर्ण डिजिटल मीटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट यासारखे फिचर्स आहेत, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

नवीन SplendorPlus XTEC खरेदी करताना ग्राहकांना पाच वर्षांची वॉरंटी मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.

हिरो मोटोकॉर्पचे स्ट्रॅटेजी आणि ग्लोबल प्रोडक्ट प्लॅनिंगचे प्रमुख मालो ले मेसन म्हणाले, “हिरो स्प्लेंडर ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल आहे. जवळपास तीन दशकांपासून ही ग्राहकांची पसंती आहे. याशिवाय हे एकात्मिक यूएसबी चार्जर, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ आणि स्टॉप-स्टार्ट सिस्टम, i3S तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

एवढेच नाही तर बाईक घसरली तर इंजिन आपोआप बंद होते. याच्या स्टायलींगबद्दल सांगायचं झालं तर, त्याच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, फक्त स्टाइलला नवीन लुक देण्यासाठी नवीन ग्राफिक्स आणि कलरमध्ये लाँच करण्यात आली आहे, ही बाईक स्पार्कलिंग बीटा ब्लू, कॅनव्हास ब्लॅक, टोर्नाडोमध्ये आली आहे. पांढर्‍या हायलाइटसह दिल्या आहेत.

इंजिन आणि किंमत
इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन Splendor+ XTEC मध्ये 97.2cc BS-VI इंजिन आहे जे 7.9 BHP पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. नवीन स्प्लेंडर+ XTEC चांगल्या इंधन कार्यक्षमतेसाठी i3S पेटंट तंत्रज्ञानावर बनवली आहे. Hero Splendor+ XTEC ची दिल्लीत एक्स-शोरूम प्राईज ७२,९०० पासून सुरू होते. नवीन Splendor+ XTEC ५ वर्षांच्या वॉरंटीसह येते.

Share.