राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १ वाजता ऑनलाईन जाहीर होईल, असे गायकवाड यांनी ट्विट करत म्हटले आहे.

खालील अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येईल
http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in

Share.