Urfi Javed: सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदने (Urfi Javed) एक मोठा खुलासा केला आहे. सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या उर्फीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट (Urfi Javed Post) लिहून हा खुलासा केला आहे. पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, पंजाबी चित्रपट सृष्टीत काम करणार एक व्यक्ती गेल्या 2 वर्षांपासून तिला सतत त्रास (Urfi Javed Harassment) देत आहे. हा व्यक्ती बलात्काराची धमकी देत ​​आहे. तसेच त्याने माझे फोटो एडिट (Urfi Javed Hot Photo) करून अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उर्फीने केला आहे. एवढेच नाही तर उर्फीने या व्यक्तीबद्दल अशा गोष्टी सांगितल्या आहे जे  ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या प्रकरणी उर्फीने पोलिसात एफआयआर देखील दाखल केली आहे

काय लिहिले आहे पोस्टमध्ये

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये उर्फी जावेदने लिहिले आहे की, जवळपास 2 वर्षांपूर्वी माझ्या काही फोटोजमध्ये बदल करत या व्यक्तीने ते फोटो अनेक ठिकाणी शेअर केले. याबाबत मी 2 वर्षांपूर्वीच पोलिसांत तक्रार केली होती. आणि पोस्ट शेअर केली होती, पण आजतागायत त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हा व्यक्ती मला सतत ब्लॅकमेल करत असून तो मला व्हिडिओ सेक्सची मागणी करत आहे. मी असे केले नाही तर माझे फोटो अनेक ठिकाणी शेअर करेल. यामुळे करिअर बरबाद होईल, अशी धमकी हा व्यक्ती देत असल्याचे उर्फीने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंजाब फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे हा व्यक्ती

उर्फी जावेदने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, ब्लॅकमेल करणारी ही व्यक्ती पंजाब फिल्म इंडस्ट्रीची आहे. समाजात ही व्यक्ती मुक्तपणे फिरत आहे. ही व्यक्ती समाजासाठी घातक ठरू शकते. उर्फी जावेदने सांगितले की, मी या व्यक्तीची बहीण आशना किशोर हिच्यासोबत काम केले आहे आणि तिला याबद्दल सांगितले. सोबत पुरावा देखील दिला, मात्र तरीही तिने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही.

एफआयआर दाखल करूनही कारवाई नाही

या संपूर्ण प्रकरणाबाबत उर्फीने 14 दिवसांपूर्वी गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली होती. मात्र आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मी मुंबई पोलिसांबद्दल खूप ऐकले आहे, पण या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मला आश्चर्य वाटते असेही उर्फीने म्हटले आहे.

Share.