चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे. कारण भारतरत्न, गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं.

आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

अशी होती कारकीर्द :

28 सप्टेंबर 1929 ला एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.
वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाला सुरुवात.
लता दीदी अवघ्या 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
त्यांनी हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले.
त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत.
1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला.
लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली.
त्यांनी हजारांहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत.
2001 साली त्यांना ‘भारतरत्‍न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर ‘गानकोकिळा’ अशी बिरुदावली मिळवली.
भारत रत्नसह पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित.

Share.