चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे. कारण भारतरत्न, गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं.
📍 आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
🏥 वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
💁♂️ अशी होती कारकीर्द :
▪️ 28 सप्टेंबर 1929 ला एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.
▪️ वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाला सुरुवात.
▪️ लता दीदी अवघ्या 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
▪️ त्यांनी हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले.
▪️ त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत.
▪️ 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला.
▪️ लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली.
▪️ त्यांनी हजारांहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत.
▪️ 2001 साली त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
▪️ लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर ‘गानकोकिळा’ अशी बिरुदावली मिळवली.
▪️ भारत रत्नसह पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित.