नुकताच आणखी एक नवीन अँड्रॉइड मालवेअर ओळखला गेला आहे. थ्रेट फॅब्रिकच्या अहवालानुसार, झेनोमॉर्फ (Xenomorph) हे अँड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करणारी बँकिंग ट्रोजन आहे. हे गुगल प्ले-स्टोअरवरील ऍपमध्ये आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा अहवाल समोर आल्यानंतरही संशयास्पद ऍप प्ले-स्टोअरवरून हटवण्यात आलेले नाही.
रिपोर्टनुसार, मालवेअर युरोपमधील अँड्रॉइड यूजर्सना टार्गेट करत आहे. झेनोमॉर्फ मालवेअर फास्ट क्लीनर नावाच्या ऍपमध्ये आहे जे 50 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी डाउनलोड केले आहे. या ऍपची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की युजर्सना त्यात मालवेअर असल्याची माहितीही मिळणार नाही.
बँकिंग ट्रोजन झेनोमॉर्फ तुमच्या फोनवरील बँक ऍपवरून तुमचे बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती चोरण्यास सक्षम आहे. तुमच्या बँकेतून येणार्या प्रत्येक मेसेजचा तो मागोवा ठेवतो. फोनवर इन्स्टॉल केल्यानंतर, ते वापरकर्त्यांच्या प्रत्येक क्रियाकलापावर लक्ष ठेवते.
सर्व तपशील घेतल्यानंतर, तो बँकिंग व्यवहारासारखा इंटरफेस तयार करतो जो तुमच्या बँकेच्या वेब किंवा ऍपसारखा असतो आणि त्याद्वारे ते वापरकर्त्यांची फसवणूक करते. त्यामुळे तुमच्या फोनवरून लवकरात लवकर फास्ट क्लीनर ऍप हटवणे तुमच्यासाठी चांगले आहे.